Sanskar Varg 2021
कोरोना – लॉकडाऊनच्या ८ महिन्याच्या खंडानंतर संस्कार वर्ग आज पुन्हा सुरू करण्यात आला. सकाळी ९ ची वेळ निश्चित करण्यात आली होती. डॉ. ताई पाटील ह्यांच्या घराशेजारील मैदानात वर्ग घेण्यात आला. संस्कार वर्गात आज तिळगुळ समारंभाचे आयोजन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना तिळगुळाचे वाटप करण्यात आले. राघवेंद्र पाटणकर ह्यांनी सर्व मुलांना मार्गदर्शन केले. ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी वाटचाल करूया असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. धनंजय सावंत व मितेश शिंदे ह्यांनी तिळगुळाचे महत्व विद्यार्थ्यांना विशद करून सर्वांना शुभेच्छा दिल्या व सर्वांनी आपल्या समाजात एकोप्याने राहावे असे सांगितले. ह्यापुढे प्रत्येक रविवारी पूर्वीप्रमाणे संस्कार वर्ग सकाळी ८ ते ९ ह्या वेळेत होईल व सर्व विद्यार्थ्यांनी त्यास उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले.
एकूण उपस्थिती : विद्यार्थी – २७, शिक्षक – ३
- दिनांक १७ जानेवारी २०२१
- डॉ. ताई पाटील ह्यांच्या घराशेजारील मैदान