White Cane Safety Day
रविवार दिनांक 15 ऑक्टोबर 2023 रोजी समर्पण सेवा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे व्हाईट कॅन डे पांढरी काठी दिवस मालाड पश्चिम येथील दयानंद शाळेत संपन्न झाला. यावेळेस समर्पण सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री रमेश सावंत व सेक्रेटरी श्री किशोर लट्टू आणि श्री सत्यप्रकाश मालपाणी उपस्थित होते.
सक्षम कोकण प्रांताचे अध्यक्ष श्री राघवेंद्र मेहता, पुरुषोत्तम वायकोळ व अन्य पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते कॅन (पांढरी काठी) यांचे वाटप दहा विद्यार्थ्यांना करण्यात आले. 21 गरजू दिव्यांग बांधवांना दर महिन्याप्रमाणे रुपये 1000 ची आर्थिक मदत धान्य विकत घेण्यासाठी करण्यात आली. या महिन्याची आर्थिक मदत श्री विजय कोंडाळकर यांनी त्यांच्या मातोश्री यांच्या स्मरणार्थ केली. समर्पण सेवा चॅरिटेबल ट्रस्ट सक्षम कोकण प्रांत व श्री विजय कोंडाळकर यांचे आभार व्यक्त करीत आहे.