Samarpan Seva Trust

समर्पण सेवा चॅरिटेबल ट्रस्ट
Scolarship Program 2023

शिष्यवृत्ती प्रदान समारोह वांगणी

समर्पण सेवा चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटपाचा कार्यक्रम 11 जून 2023 रोजी सायंकाळी चार वाजता रामदास सेवाश्रम येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री जयंत बेंद्रे व रामदास सेवाअश्रमचे श्री परगबुवा रामदासी उपस्थित होते. सर्वप्रथम श्री राघवेंद्र पाटणकर यांनी प्रास्ताविक मध्ये वांगणी येथील संस्कार वर्ग ची उपस्थिती वाढत असल्याचे सांगितले.
श्री किशोर लट्टू यांनी अठरा वर्षाच्या आतील मुलांना कॉम्प्युटरचे प्रशिक्षण वर्ग व 18 वर्षाच्या वरील विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचे प्रशिक्षण व नंतर नोकरी मिळावी अशा पद्धतीचे प्रशिक्षण देण्याचा मानस व्यक्त केला.
श्री हरीश जालान यांनी सातत्याने कार्य करत राहिल्यामुळे कार्य वाढत जाते असं सांगून समर्पण सेवा चॅरिटेबल ट्रस्ट हे त्याचे एक उदाहरण आहे. 2014 साली एक संस्कार वर्ग सुरू केला होता आणि मग त्यातून कार्यकर्ते मिळत गेले आणि आता दुसराही संस्कार वर्ग सुरू झाला आहे व त्यातही उपस्थिती वाढत आहे हे एका दिव्यातून दुसरा दिवा प्रज्वलित करावा अशा पद्धतीने हे कार्य वाढत आहे.
श्री पराग बुवा रामदासी यांनी वांगणी मध्ये अशा अनेक संस्कार वर्गांची आवश्यकता आहे अशी भावना व्यक्त केली व समर्पण सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यकर्त्यांना संस्कार वर्ग चे कार्यकर्ते वाढावे असे सांगितले.
श्री जयंत बेंद्रे हे दृष्टीहीन असूनही त्यांना श्री मदभगवद् गीता चे 18 अध्यायचे श्लोक तोंडपाठ आहेत. त्यांनी 18 व्या अध्यायचा श्लोक म्हणून दाखविला व उपस्थित लोकांना त्याचा अर्थ सांगून मार्गदर्शन केले.
श्री रमेश सावंत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की व अराष्ट्रीय प्रवृत्तीच्या लोकांनी हात पाय पसरायला सुरुवात केलेली आहे. खूप मोठ्या प्रमाणात धर्मांतर घडवून आणत आहेत तरी आपण सर्व बांधवांनी सजग राहून त्यांचा देशविघातक प्रवृत्तीचा डाव हाणून पाडला पाहिजे व आपण आपल्या मनामध्ये राष्ट्रीय भावना जपून राष्ट्रीयत्वाचा विचार केला पाहिजे.
त्यानंतर शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. साठ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप या कार्यक्रमात करण्यात आले.
श्री राघवेंद्र पाटणकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत कार्यक्रम संपला असे जाहीर केले.
कार्यक्रमाला एकूण 125 संख्या होती.

scholarship 2023 (9)
scholarship 2023 (8)
scholarship 2023 (7)
scholarship 2023 (6)
scholarship 2023 (5)
scholarship 2023 (4)
scholarship 2023 (3)
scholarship 2023 (2)
scholarship 2023 (1)
loader