Samarpan Seva Trust

समर्पण सेवा चॅरिटेबल ट्रस्ट
Scholarship program 2025 – Vangani

समर्पण सेवा चॅरिटेबल ट्रस्ट ही एक स्वयंसेवी संस्था आहे, जी दिव्यांग व्यक्ती तसेच त्यांच्या मुलांच्या सक्षमीकरण आणि उत्थानासाठी समर्पित आहे.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजय देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा आणि एकाग्रता कशी वाढवावी याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी सातत्य आणि मेहनतीचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या मुख्य वक्त्या निवेदिता मोहिते यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कथा सांगून कोणत्याही अडचणींमुळे अडून न बसण्याचे आवाहन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना संघर्ष करून स्वतःचा मार्ग तयार करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण झाला. रामदास सेवाश्रमाचे पराग बुवा यांनी आशीर्वाचन पर भाषण केले.

या कार्यक्रमाला टीम व्हिजनचे संजय भिंगार्डे उपस्थित होते. वांगणीच्या ताई पाटील उपस्थित होत्या. समर्पण सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रमेश सावंत यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले.  ट्रस्टचे पदाधिकारी किशोर लट्टू, किशोर नार्वेकर, हरीश जालान आणि वांगणी तसेच मुंबई तील अनेक प्रतिष्ठित मंडळी या कार्यक्रमास उपस्थित होती.  या ट्रस्टचा उद्देश दिव्यांग पालकांच्या मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम बनवणे आहे. प्रत्येक वर्षी जवळपास २०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करून त्यांच्या स्वप्नांना पंख दिले जातात.  या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा मिळते.

No Posts Found!

loader